मुस्लिमांच्या वाईट स्थितीला जबाबदार कोण? 'ही' आकडेवारी जाहीर करत ओवैसींचा थेट सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asaduddin Owaisi

ओवैसींनी मुस्लिमांच्या दयनीय स्थितीचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध केलाय.

मुस्लिमांच्या वाईट स्थितीला जबाबदार कोण?

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन पक्षाचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी काल (शुक्रवार) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुस्लिमांच्या दयनीय स्थितीचा तपशीलवार अहवाल प्रसिद्ध केलाय. राज्यातील मुस्लिमांच्या दुर्दशेला जबाबदार कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ (Lucknow) येथे 'मुस्लिम विकास, सुरक्षा आणि उत्तर प्रदेश' या विषयावरील या परिषदेत नामवंत विद्वान सहभागी झाले होते. यावेळी ओवैसींनी मुस्लिमांच्या विकासाशी संबंधित त्यांचे अनुभव शेअर करत सरकारी आकडेवारीच्या आधारे मुस्लिमांच्या दुर्दशेचा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला.

लखनऊमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, राज्यातील मुस्लिम समाज शिक्षण, रोजगार आणि जमीन मालकीच्या बाबतीत विकासाच्या सर्वात खालच्या स्तरावर आहे. 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट पॉलिसी अॅण्ड प्रॅक्टिस'ने जारी केलेल्या 76 पानांच्या या अहवालात उत्तर प्रदेशात मुस्लिम समाज (Muslim Community) कशाप्रकारे वाईट जीवन जगत आहे, हे डेटाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. ओवैसींच्या उपस्थितीत हा अहवाल डॉ. व्यंकटनारायण मोतुकुरी, प्रा. अब्दुल शाबान, डॉ. अमीर उल्ला खान, पीसी मोहनन यांसारख्या प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आणि डेटा विश्लेषकांनी प्रसिद्ध केला. सुप्रसिद्ध संशोधक अमिताभ कुंडू, चंद्रशेखर, क्रिस्टोफर जाफ्रेलॉट, उषा सन्याल, विल्यम जॉय, एसव्ही सुब्रमण्यन, सी रवी आणि माजी निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी यांनीही याची तयारी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलीय. हा अहवाल 2011 च्या जनगणनेच्या आधारे, तसेच शिक्षण आणि विकासाच्या इतर क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांच्या डेटाच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा: 'सत्तेच्या भुकेसाठी मोदींनी पुलवामा घटना घडवून आणली'

या अहवालानुसार, उत्तर प्रदेशात 15 वर्षांवरील 71.2 टक्के मुस्लिम एकतर पूर्णपणे निरक्षर आहेत किंवा त्यांनी केवळ प्राथमिक स्तरावरील शिक्षण घेतलंय. राष्ट्रीय स्तरावर हा आकडा 58.3 टक्के आहे. याचा अर्थ असा की, उत्तर प्रदेशात मुस्लिमांमधील निरक्षरता देशभरातील सरासरी शिक्षणाच्या आकडेवारीपेक्षा खूप जास्त आहे. PLFS च्या मते, 2019-20 मध्ये देशातील पूर्णपणे निरक्षर लोकांची संख्या 34.01 टक्के आहे, तर उत्तर प्रदेशात 40.83 टक्के मुस्लिम पूर्णपणे निरक्षर आहेत. केवळ 28.49 टक्के मुस्लिम प्राथमिक स्तरापर्यंत शिक्षित आहेत, तर राष्ट्रीय स्तरावर हे प्रमाण 25.11 टक्के आहे. राज्यातील केवळ 16.8 टक्के मुस्लिम मध्यम स्तरापर्यंत म्हणजेच, इयत्ता आठवीपर्यंत शिक्षित आहेत. राष्ट्रीय स्तरावर हा आकडा 25.5 टक्के आहे. ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील केवळ 4.4 टक्के मुस्लिमांकडे विद्यापीठाची पदवी आहे. मात्र, गेल्या दशकात त्यात थोडी सुधारणा झालीय. 2009-10 पर्यंत हा आकडा केवळ 2.7 टक्के होता.

हेही वाचा: 5 राज्यांतील निवडणुकांच्या तारखांची आज मोठी घोषणा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top