esakal | Breaking News : भूकंपाने कोयना धरण क्षेत्र हादरले; 20 मिनिटांत दोन धक्के

बोलून बातमी शोधा

Earthquake
Breaking News : भूकंपाने कोयना धरण क्षेत्र हादरले; 20 मिनिटांत दोन धक्के
sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात आज (मंगळवार) दुपारी तीनच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरातील गावांनाही बसले आहेत.

कोयना धरण क्षेत्रात आज (मंगळवार) दुपारी 3.22 मिनिटांनी पहिला भूकंप 3.02 रिश्टर स्केल इतका होता, तर दुसरा भुकंप 3.44 मिनिटांनी 3.00 रिश्टर स्केल होता. या भूंकपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यातील किकली या गावाच्या सात किलोमीटरअंतरच्या पूर्वेला होता. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची माहिती कार्यकारी अभियंता वैभव फाळके, कोयना सिंचन विभाग यांनी ई-सकाळशी बोलताना दिली.

एकंबेत डबल सेंच्युरी; घरोघरी बाधित सापडल्याने गाव बनले 'हॉटस्पॉट'

Edited By : Balkrishna Madhale