

ED Cracks Down in Panchgani, Assets Worth Crores Taken Over in Probe
sakal
पाचगणी : पर्यटननगरी पाचगणी येथे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई करत, जुनैद इक्बाल मेमन यांच्या प्लॉट क्रमांक २२३ वरील ऐतिहासिक ‘बरुचा बंगला’ मधील दोन-तृतीयांश अविभाजित हिस्स्यासह तीन ठिकाणची मिळकत सील केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, बंगल्यावर नोटीस चिटकविण्यात आली आहे. त्या नोटिशीतील तपशीलानुसार ही माहिती स्पष्ट होत आहे.