तरडगाव दरोडाप्रकरणी आठ जणांना अटक; सात लाखांचा ऐवज जप्त

परहर फाट्यावर कोयत्याचा धाक दाखवून कार चालकाला लुटून दरोडा टाकल्याप्रकरणी आठ जणांना लोणंद पोलिसांनी अटक केली
Crime
CrimeSakal

सातारा : तरडगाव (ता. फलटण) येथील परहर फाट्यावर कोयत्याचा धाक दाखवून कार चालकाला लुटून दरोडा टाकल्याप्रकरणी आठ जणांना लोणंद पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या चार दुचाकी व रोख रक्कम असा सुमारे पावणेसात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.

दत्तात्रय किसन शिरवले (वय १९) व विशाल लक्ष्मण शिरवले (वय २०, दोघे रा. शिरवली, ता. भोर जि. पुणे), कृष्णा आनंदा चव्हाण (वय २३, रा. आसेगाव ता. बसमत, जि. हिंगोली), रोहन सचिन भालके (वय १८, रा. सच्चाईमाता मंदिर, कात्रज, पुणे), शिवा उन्नाप्पा राठोड (वय २१) व पवन विकास ओव्हाळ (वय २०, दोघे रा. चैत्रबन वसाहत अपर, इंदिरानगर बिबवेवाडी, पुणे), राजू अशोक जाधव (वय २०, रा. माणगाव, हिंजवडी, पुणे) व प्रमोद ऊर्फ बारक्या श्रीकांत पारसे (वय २१, रा. संतोषनगर, जैन मंदिराजवळ भारती विद्यापीठ, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.

Crime
...म्हणून मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा - तायवडे

गुरुवारी (ता. ९) तरडगाव हद्दीत परहर फाटा ते मॅग्नेशिया कंपनीकडे जाणाऱ्या रेल्वे पुलावर पाच चोरट्यांनी कारचालकास कोयत्याचा धाक दाखवून ५ लाख ९ हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल, तसेच कारची चावी लंपास केली आहे. याबाबत लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
'राज्यपालांना लिहिलेलं पत्र अपरिपक्वतेचं लक्षण'

घटनेनंतर उपअधीक्षक तानाजी बरडे, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला होता. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून लोणंद, शिरवळ व फलटण शहर पोलिस ठाण्याच्या वेगवेगळ्या चार टीम तयार केल्या होत्या. या पथकांनी अल्पावधीत गुन्हा उघडकीस आणून पुणे शहरातून कात्रज, बिबवेवाडी या परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या रकमेपैकी ४ लाख एक हजार ५०० रुपये रोख रक्कम, फिर्यादीचा मोबाईल व चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Crime
IPL 2021: सनरायजर्स हैदराबादच्या नटराजनला कोरोनाची लागण

पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. अधीक्षक बन्सल, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक तानाजी बरडे, लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विशाल वायकर, उपनिरीक्षक गणेश माने, स्वाती पवार, हवालदार महेश सपकाळ, अविनाश नलवडे, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, विठ्ठल काळे, अभिजित घनवट, सागर धेंडे, अविनाश शिंदे, फैयाज शेख, गोविंद आंधळे, केतन लाळगे, अमोल पवार, ज्ञानेश्वर साबळे, विजय शिंदे, तसेच शिरवळ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर आरगडे, हवालदार अमोल जगदाळे, स्वप्नील दौण्ड व फलटण शहर पोलिस ठाण्याचे अमोल कदम, हवालदार सुजित मेंगावडे, अच्युत जगताप यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे.

मोकाची चाचपणी

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये मोका कायद्यानुसार कारवाई करण्याजोगी परिस्थिती असल्यास या गुन्ह्याला मोका लावणार असल्याचे पोलिस अधीक्षक बन्सल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com