
सातारा : जिल्ह्यामध्ये आणखी 18 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. दिवसात 130 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या 20 जणांना दहा दिवसांनंतर घरी सोडण्यात आले. खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 61 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
कऱ्हाड तालुक्यातील हिंगनोळे येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता आणखी 17 बाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कऱ्हाड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील 59 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22 वर्षीय पुरुष, येळगावातील 65 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 39 वर्षीय पुरुष, सैदापुरातील 29 वर्षीय पुरुष, सुपनेमधील 37 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील कराटे येथील 59 वर्षीय पुरुष, कोरेगावमधील 39 वर्षीय महिला, फलटण तालुक्यातील शेऱ्याचीवाडीतील (हिंगणगाव) 10 वर्षीय मुलगा, माण तालुक्यातील दहिवडीमधील 39 वर्षीय पुरुष, 21 व 17 वर्षीय तरुण, खटाव तालुक्यातील शिरसवाडीमधील 4 वर्षाची बालिका व 32 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील आरे तर्फ परळीतील 55 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील कडेगाव येथील 74 वर्षीय महिलेला बाधा झाली.
वाकळवाडी (ता. खटाव) येथील 61 वर्षीय पुरुष हा 14 जून रोजी मुंबईहून आला. वाकळवाडीत घरीच विलगीकरणात होता. ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी 11 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये माण तालुक्यातील पिंपरी येथील 28 वर्षीय महिला, 58 व 70 वर्षीय पुरुष, वडजल येथील 56 व 38 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 55 वर्षीय पुरुष, भालवडी येथील 25 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील वडगाव येथील 68 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील प्रभुचीवाडी येथील 52, 28 व 26 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, कळकोशी येथील 39 वर्षीय महिला, जावळी येथील 43 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील पाचवड येथील 30 वर्षीय पुरुष, पळसगाव येथील 41 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील वावदरे येथील 45 वर्षीय महिला, माणगाव (अतित) येथील 35 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 65 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
जिल्ह्यामधील विविध ठिकाणी दाखल असलेल्या 134 जणांचे नमुने आज तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील 21, कृष्णा हॉस्पिटलमधील 28, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयातील 19, कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 4, वाई ग्रामीण रुग्णालयातील 7, शिरवळ येथील 5, रायगाव येथील 7, पानमळेवाडी येथील 6, मायणी येथील 11, महाबळेश्वर येथील 1, पाटण येथील 25 जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 130 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सावधान! साताऱ्याला कोरोनाचा विळखा वाढतोय
साताऱ्यात नवीन कंटेनमेंट झोन
शहरातील केसरकर पेठेतील हरिजन-गिरीजन सोसायटीमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे या परिसरात कंटेनमेंट झोन जाहीर करण्याबाबत मुख्याधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर मिनाज मुल्ला यांना पत्र दिले होते. त्यानुसार त्यांनी आज हरिजन- गिरीजन सोसायटीमधील संपूर्ण सी विंग कंटेनमेंट झोन जाहीर केली आहे. दरम्यान, वावदरे (ता.सातारा) येथील कंटेनमेंट झोनमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
युवकांनो, सावधान नोकरीच्या भूलथापांना नका फसू!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.