esakal | एकनाथ गायकवाड Visiting Card वरील नावासमोर 'कोंडवेकर' हा शब्द लिहायचेच!

बोलून बातमी शोधा

Eknath Gaikwad

एकनाथ गायकवाड Visiting Card वरील नावासमोर 'कोंडवेकर' हा शब्द लिहायचेच!

sakal_logo
By
सुनील शेडगे

सातारा : एकनाथ गायकवाड आमदार झाले, खासदार बनले. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपदाची धुरादेखील सांभाळली. या यशस्वी वाटचालीत आपण कोंडवे गावचे सुपुत्र असल्याचा त्यांना अभिमान होता. त्यामुळेच सुरूवातीच्या काळात ते आपल्या 'व्हिजिटींग कार्ड'वरील नावासमोर कोंडवेकर हा शब्द लिहित असत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे आज मुंबईत निधन झाले. मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा निवडून गेले होते. दोन वेळा राज्याचे कॅबिनेट मंत्रिपदही त्यांनी भूषविले होते. लोकसभेच्या मुंबई दक्षिण मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधीत्व केले होते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी पेलली होते. या यशस्वी वाटचालीत कोंडवे या गावशी त्यांचे ऋणानुबंध होते. सातारा शहरालगत असलेले कोंडवे हे त्यांचे गाव. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल. बालपणीच त्यांचे मातृ पितृछत्र हरपले. त्यामुळे बोरखळ (ता. सातारा) या आजोळी त्यांचे काही काळ वास्तव्य होते.

स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हा, कोणाचा वशिला घेऊ नका; एकनाथरावांच्या आठवणींने कोंडवेत हळहळ

धारावीतून आमदार म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरूवात केली. राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर त्यांचा कोंडवे गावात सत्कारही आयोजिण्यात आला होता. सुरूवातीच्या काळात आपल्या 'व्हिजिटींग कार्ड'वरील नावासमोर ते कोंडवेकर असा उल्लेख आवर्जून करत असल्याची आठवण कोंडवे येथील शिक्षक दीपक भुजबळ यांनी सांगितली. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आयोजित सत्कार कार्यक्रमात भाषण करत असल्याचे कृष्णधवल छायाचित्रही आपल्या संग्रही असल्याचे श्री. भुजबळ यांनी या वेळी नमूद केले. दीपक भुजबळ यांचे वडील शंकरराव भुजबळ यांच्याशीही त्या काळी त्यांचा पत्रव्यवहार सुरू असे.

Edited By : Balkrishna Madhale