esakal | स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हा, कोणाचा वशिला घेऊ नका; एकनाथरावांच्या आठवणींने कोंडवेत हळहळ

बोलून बातमी शोधा

Eknathrao Gaikwad

स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हा, कोणाचा वशिला घेऊ नका; एकनाथरावांच्या आठवणींने कोंडवेत हळहळ

sakal_logo
By
किरण गाडे

कोंडवे (सातारा) : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार एकनाथराव गायकवाड यांचे नुकतेच मुंबई येथील ब्रीच कॅन्डी हॅास्पिटलमध्ये कोरोनाने निधन झाले. हे ऐकून फारच धक्का बसला. मीही बातमी माझ्या कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांनाही खूपच दुःख झाले. एकनाथराव गायकवाड हे नात्याने माझे चुलत भाऊ लागत होते. त्यांना सर्वजण आण्णा म्हणत, असे त्यांचे चुलतभाऊ संदीप गायकवाड यांनी सांगितले. त्यांच्याविषयी थोडंसं..

आण्णा हे मुळ जरी कोंडव्याचे असले तरी त्यांचा जन्म हा बोरखळ (ता. सातारा) येथे त्यांच्या आजोळी झाला होता. लहानपणीच त्यांचे आई-वडील गेल्याने त्यांच्या आजीने त्यांना सांभाळले. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे बोरखळ येथेच झाले. नंतर त्यांनी पुढील शिक्षण वरळी मुंबई येथे पूर्ण केले. त्यानंतर वेस्टर्न रेल्वेला हमाल म्हणून ते कामाला लागले. कोंडवे गावात तसं त्यांचं येणे-जाणे हे दुर्मिळच. परंतु, ज्यावेळी ते गावी यायचे. त्यावेळी ते आमच्या घरी आवर्जुन यायचे. आमचे आजोबा जोतिराम मनु गायकवाड म्हणजेच नाना व आण्णांचे चांगले संबंध होते. तसे पाहिले तर गाव म्हणून त्यांना त्यांचे घर व जमिनसुध्दा माहिती नव्हती. मग नानांबरोबर थांबून ते गावची माहिती घ्यायचे. नाना हे त्यांचे आजोबाच लागत होते.

..तरच मुलीच्या नावे होणार 50 हजार रुपये; जाणून घ्या 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेबद्दल नवे नियम

नानांच्या निधनानंतर ते त्यांच्या दशक्रीया विधीला स्वतः उपस्थित होते. त्यावेळी मदनदादा भोसले हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. त्यानंतर ते नेहमी गावाशी संपर्क ठेवून असतं. काही अडीअडचण आल्यास ते लगेच फोन करून संपर्क साधायचे. तसेच गावाला यायचे झाल्यास सर्किट हाऊसला थांबायचे व मला फोन करून संदीप तू कुठे आहेस. लगेचच मला भेटायला ये, असेही म्हणायचे. त्यानंतर मी आणि आण्णा एकञ जेवण करून रात्री उशीरापर्यंत गप्पा मारत बसायचो. आण्णा मला नेहमी सांगायचे की, कोणाचेही पाठबळ नसताना इतक्या मोठ्या पदापर्यंत मी पोहोचलो आहे. तरी तुम्ही सुद्धा स्वतःच्या हिमतीवर कर्तृत्वाने मोठे व्हा. कोणाचाही वशिला घेऊ नका, असे आण्णा नेहमी सांगत होते. आण्णा म्हणजे आमच्या गावातील सर्वात उच्च पदावर गेलेली व्यक्ती त्यामुळे आम्हाला आण्णांचा अभिमान वाटत होता, असेही संदीप गायकवाड यांनी सांगितले.

जगभरात कोरोनाचं थैमान; ऑक्सिजन देणारी 'ही' 9 वृक्ष वाचवतील का आपला प्राण?

आण्णांचे वस्तीतील लोकांशी चांगले संबंध होते. ते गावी आल्यावर वस्तीतील लोकांच्या आवर्जुन गाठीभेठी घेत असत. त्यांची शेती आमच्या शेतीजवळच असल्याने आण्णा गावी आल्यावर माझ्या घरी यायचे. समाजासाठी काही करता येत असेल तर आम्हाला सूचवा, असे नेहमीच ते सांगायचे. गावची लोकं मुंबईला गेली तरी आण्णा आपुलकीने चौकशी करत. त्यांचे जे काय काम असेल ते करून त्यांना जेऊ खाऊ घालायचे. खरंच आण्णांनी आमच्या वस्तीतील लोकांची मने जिंकली होती.

-आबा गायकवाड, एकनाथराव गायकवाड यांचे चुलतभाऊ

Edited By : Balkrishna Madhale