
Eknath Shinde’s Warning to Rivals: “Satara Water is Non-Negotiable”
Sakal
सातारा : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत भगवा फडकावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही ताकदीने लढवून जिल्हा परिषदा व पंचायत समितींवर भगवा फडकावायचा आहे. त्यासाठी ‘माझी शिवसेना, मी शिवसेनेचा’ हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवून काम करा आणि आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना चारीमुंड्या चीत करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केले.