Satara AccidentSakal
सातारा
Satara Accident: मोटारीच्या अपघातात पिंपोड्यातील वृद्धेचा मृत्यू; उभ्या असलेल्या गंगूबाई मानेंना पाठीमागून जोरदार धडक
Tragic Accident in Pimpode: सातारा- लोणंद रस्त्यावर पिंपोडे खुर्द येथे ९ जुलैला रात्री ९ वाजता भरधाव वेगात आलेल्या चारचाकीने (एमएच ०१ एव्ही ३८९२) बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या गंगूबाई माने यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
वाठार स्टेशन: पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथील कार अपघातात जखमी झालेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. गंगूबाई शंकर माने (वय ७०, रा. पिंपोडे खुर्द) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, की सातारा- लोणंद रस्त्यावर पिंपोडे खुर्द येथे ९ जुलैला रात्री ९ वाजता भरधाव वेगात आलेल्या चारचाकीने (एमएच ०१ एव्ही ३८९२) बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या गंगूबाई माने यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.