Elderly Woman Murdered with Stone: साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांनी आरोपी प्रशांत ननावरे यास दोषी ठरवून जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची, तसेच दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
Court sentences accused to life imprisonment in brutal murder of elderly woman using stone as weapon."Sakal
वडूज : वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने गुन्हेगारास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रशांत ऊर्फ संतोष विश्वनाथ ननावरे (रा. अंभेरी, ता. खटाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.