
सातारा : पर्यावरणपूरक प्रवासासाठी सुरू केलेल्या एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसना टोल माफ करण्याची घोषणा सरकारने केली. मात्र, प्रत्यक्षात अध्यादेश न आल्याने राज्य परिवहन महामंडळाला दर महिन्याला किमान १० लाख ८५ हजार रुपयांचा टोल भरावा लागत आहे. सातारा विभागातून परजिल्ह्यात जाणाऱ्या व विशेषत: सातारा- स्वारगेट मार्गावरील दररोज संचलन करणाऱ्या ई- बसची संख्या जास्त असल्याने महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.