कांद्याची ऐरण जळून लाखोंची हानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांद्याची ऐरण जळून लाखोंची हानी

कांद्याची ऐरण जळून लाखोंची हानी

खटाव: येथील मळ्यात विजेच्या तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून सुमारे सात टन कांदा जळाल्याने शेतकरी राजू करळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी शिवारातील नवनाथ माने, जयकुमार माने, अरुण पवार, मुगुटराव पवार व विजय भूप या शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने मोठे नुकसान टळले.

येथील रामकाठी शिवारात राजेंद्र करळे यांची दोन एकर कांदा पिकाची ऐरण होती. या शिवारात अनेक खांब झुकलेल्या अवस्थेत असल्याने विजेच्या बऱ्याच तारा खालून गेल्याने अक्षरशः या तारा लोंबकळत आहेत. परिणामी वारा आला, तरी या तारा हेलकावे घेत एकमेकांना चिकटून या परिसरात ठिणग्या पडत असतात. या ठिणग्या पडून मोठी दुर्घटना घडू शकते, याबाबत महावितरणकडे तक्रार करूनही महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे राजेंद्र करळे यांनी सांगितले.

आज दुपारी जोराचा वारा सुटल्याने या तारांचे घर्षण होऊन ठिणग्या ऐरणीवर पडल्याने ऐरणीने पेट घेतला. त्यामुळे कांदा पिकाचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे श्री. करळे यांनी सांगितले.

याची माहिती मिळताच आमदार महेश शिंदे यांनी वीज वितरणचे तालुका कार्यकारी अभियंता मुंडे यांना पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या. महावितरणचे अधिकारी राक्षे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्पुरत्या स्वरूपात वीज कनेक्शन बंद केले.

Web Title: Electric Wires Millions Burning Onion Iron

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top