प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; 'लिफ्ट बंद' पडल्याने नागरिकांत संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; 'लिफ्ट बंद' पडल्याने नागरिकांत संताप

सातारा शहरातील प्रशासकीय इमारतीत मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. या ठिकाणी कौटुंबिक न्यायालय, जिल्हा माहिती कार्यालय, राज्य गुप्तवार्ता विभाग, जिल्हा कृषी कार्यालय, महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व इतर काही शासकीय विभागांची कार्यालये असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, मागील काही महिन्यांपासून लिफ्ट बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; 'लिफ्ट बंद' पडल्याने नागरिकांत संताप

सातारा : शहरातील पोलिस परेड मैदानाशेजारी असणाऱ्या प्रशासकीय इमारतीमधील लिफ्ट मागील काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने लवकरात-लवकर लिफ्ट सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

शहरातील प्रशासकीय इमारतीत मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. या ठिकाणी कौटुंबिक न्यायालय, जिल्हा माहिती कार्यालय, राज्य गुप्तवार्ता विभाग, जिल्हा कृषी कार्यालय, महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रदूषण नियंत्रण विभाग, सेवायोजन कार्यालय व इतर काही शासकीय विभागांची कार्यालये असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, मागील काही महिन्यांपासून लिफ्ट बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. 

कारखान्यांमुळे वाहतूक कोंडी; प्रतिनिधींनी तत्काळ पुढाकार घ्यावा, प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

तसेच प्रशासकीय इमारत पाच मजली असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयांमध्ये वरच्या मजल्यावर जाताना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित विभागाने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरात-लवकर लिफ्ट सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. "प्रशासकीय इमारतीत काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच इमारतीत विविध कार्यालयांमध्ये सतत यावे लागते. मात्र, लिफ्ट बंद असल्याने जिन्यावरून चालताना त्रास होतो. त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात-लवकर लिफ्ट सुरू करावी,'' अशी मागणी ज्येष्ठ नागरिक राजाराम चव्हाण यांनी केली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top