
सातारा : टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा इलॉन मस्कची (Elon Musk) टेस्ला कंपनी (Tesla Company) सातारा जिल्ह्यात आपल्या युनिटसाठी जमीन शोधत असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (इव्ही) पूर्णपणे वेगळे असे असेम्ब्ली (CKD) युनिट कंपनीकडून उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जर याला मूर्त स्वरूप आले, तर साताऱ्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासामधील आतापर्यंतची ही सर्वात मोठी घडामोड ठरणार आहे.