
कऱ्हाड : वाढत्या शहरकरणाच्या विकासाबरोबर त्यांच्या सौंदर्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यात अतिक्रमण ही फार मोठी अडचण होताना दिसते. ती हटविण्याची मोहीम पालिकेने राबवली होती. त्यात सातत्य नसले, तरी तक्रार आली, की ती मोहीम राबवली जाते. मात्र, हॉकर्स झोनबाबत १४ वर्षांपासून काहीच ठोस धोरण ठरवता आलेले नाही. पालिकेनेही काहीच पावले उचललेली नसल्याने हॉकर्स झोनचा प्रश्न प्रलंबित आहे. दोन वर्षांच्या प्रशासकीय कारभारातही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मात्र, त्यासाठी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी पुढाकर घेणार असल्याचे सूतोवाच नुकतेच दिले. त्यानुसार त्यावर ठोस निर्णय होण्याची गरज आहे.