ठरलं तर! वाहतूक शाखा, सातारा पालिका राबविणार अतिक्रमण हटाव मोहीम

गिरीश चव्हाण
Sunday, 24 January 2021

वाहतूक शाखेने सातारा तहसीलदार कार्यालयालगत असणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्‍त करत आहेत.

सातारा : वाहतुकीस अडथळा ठरणारी गोडोली चौकातील काही अतिक्रमणे आज सातारा शहर वाहतूक शाखेच्या विभागाने हटवली. काही अतिक्रमणे हटविल्यानंतर ही मोहीम थंडावली असली, तरी येत्या काही दिवसांत वाहतूक शाखा व सातारा पालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागांत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. 

शहराच्या विविध भागांतील वर्दळीच्या रस्त्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागतो. यामुळे अशा अतिक्रमणांचा सातारा शहर वाहतूक शाखेने नुकताच आढावा घेतला होता. यानुसार आज सकाळी गोडोली येथील साई मंदिर चौकातील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला. यानुसार वाहतूक शाखेचे कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी चौकातील दुकाने, पानटपऱ्या, वडापावच्या गाड्या हटवत त्यांनी केलेली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांनी दुकानांसमोरील अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली.

अतिक्रमणे हटवल्याने या चौकातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. वाहतूक शाखेने सातारा तहसीलदार कार्यालयालगत असणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्‍त करत आहेत.

साताऱ्यातील अंबेदरेत पाच जणांवर मारामारीचा गुन्हा; गाडी लावण्यावरुन झाला होता वाद

पंकजाताईही महाबळेश्वरच्या प्रेमात, ट्विटद्वारे दिली माहिती आणि फोटोही केले शेअर

सरकारी कर्मचाऱ्यांनाे! BSNLने तुमच्यासाठी आणलीय खास याेजना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachments Will Be Removed By Traffic Department And Muncipal Council Satara Marathi News