

Political Maze Cracked as Akshay Jadhav Topples 25-Year Rule
esakal
सातारा: निवडणुकीत अक्षय जाधव या नवख्या तरुणाला पहिल्यांदाच शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्याविरोधात शाहूपुरी ग्रामपंचायतीची सत्ता स्थापनेपासून स्वत:च्या ताब्यात ठेवणाऱ्या, तसेच पंचायत समितीचे उपसभापतिपद भूषविलेल्या संजय पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात होते. येथील लढत अक्षय जाधव यांच्या माध्यमातू्न शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रतिष्ठेची केली होती. येथील निवडणुकीत राजकारणाच्या दृष्टीने कोरी पाटी असणाऱ्या अक्षय जाधव या नवख्या उमेदवाराला मतदारांनी पसंती देत शाहूपुरीच्या राजकारणातील पंचवीस वर्षांची पाटीलकी संपुष्टात आणली.