esakal | सावित्रीबाई फुलेंवर लिहा निबंध; मिळवा हजाराे रुपयांची बक्षीसे
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई फुलेंवर लिहा निबंध; मिळवा हजाराे रुपयांची बक्षीसे

इच्छुकांनी सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत यापैकी एका विषयावर निंबध लिहावा. 

सावित्रीबाई फुलेंवर लिहा निबंध; मिळवा हजाराे रुपयांची बक्षीसे

sakal_logo
By
अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. तीन) नागपूर येथील महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (महाज्योती) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी रोख रक्कम स्वरूपात बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन "महाज्योती'चे संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी केले आहे. 

महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ही ओबीसी, भटके जाती, जमाती आणि विशेष मागास वर्ग यांच्या विद्यार्थी व युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेली स्वायत्त संस्था आहे. या संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, त्यांच्या समाजकार्याची उजळणी व्हावी व त्यांच्या कार्याचे नवीन पिढीत बिजांकुर व्हावे या उद्देशाने तीन जानेवारी 2021 या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन म्हणून जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक 50 हजार, द्वितीय 35 हजार व तृतीय 25 हजार, तर जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकास दहा हजार, द्वितीय क्रमांक पाच हजार व तृतीय क्रमांक अडीच हजार अशी बक्षिसे आहेत.

शेतीतील नवनव्या प्रयोगातून शेणोलीत विद्यार्थ्याची लाखाेंची कमाई 

इच्छुकांनी सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत यापैकी एका विषयावर निंबध लिहावा. या निबंधाची शब्दमर्यादा एक हजार इतकी राहील. हे निबंध www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर 27 डिसेंबरपर्यंत अपलोड करावयाचे आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top