esakal | स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशनचा विलासकाकांचा उपक्रम तरुणांना प्रेरणादायी : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशनचा विलासकाकांचा उपक्रम तरुणांना प्रेरणादायी : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

एका स्वातंत्र्यसैनिकाचे पुत्र असल्यामुळे ध्येयाने व प्रामाणिकपणाने वागणे, आपल्या कार्यावर निष्ठा ठेवून सेवा करणे- हे गुण त्याच्यात उपजतच आले. विलासकाकांनी नव्या पिढीत स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी कायम राहाव्यात व त्यातून देशाची सेवा करण्याची प्रेरणा तरुणांना मिळावी, यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन घेण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला.

स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशनचा विलासकाकांचा उपक्रम तरुणांना प्रेरणादायी : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सन १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या भारत देशातील जनतेने स्वतःला दिलेल्या राज्यघटनेची अंमलबजावणी १९५० मध्ये झाली. घटनेनुसार पहिल्या निवडणुका १९५२ मध्ये झाल्या. या निवडणुकीत केंद्रात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या व मुंबई राज्यात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाची सरकारे सत्तेवर आली.
 
स्वातंत्र्यानंतरचा हा काळच ज्याला भारलेला व मंतरलेला म्हणता येईल, अशा स्वरूपाचा होता. गांधीहत्या, तेलंगणामधील डाव्यांचा उठाव, सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन हे धक्के पचवून समाज नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशाची उभारणी करण्यास सज्ज झाला होता. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून विकासाचे नवे प्रयोग सुरू झाले होते. पण इतिहास सरळ गतीने चालत नसतो. काँग्रेसनेच स्वीकारलेल्या भाषावार प्रांत रचनेच्या तत्त्वाची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी वेगवेगळ्या भाषिक समूहांकडून होऊ लागली. त्याला महाराष्ट्राचा अपवाद असण्याचे कारण नव्हते. या मागणीला व्यापक आंदोलनाची दिशा मिळाली.

सलग सात वेळा आमदार राहिलेल्या विलासकाकांचा असा झाला राजकीय प्रवास 

सुरुवातीच्या काळात तडजोड म्हणून द्विभाषिक राज्याची कल्पना पुढे आली असल्यामुळे त्यांनी नदीजोड प्रकल्पाद्वारे कराड दक्षिणेतील २२०० हेक्टर जमिनीला पाणी मिळवून दिले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे त्यासाठी २५ कोटी रुपये सुद्धा मिळाले. तसेच डोंगरी विभागात जलसंधारणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्याचा उपक्रम देखील राबविला. यातच त्यांची विकासाची तळमळ दिसते. ही फार स्तुत्य बाब आहे. एक जागरूक प्रतिनिधी असल्याचा पुरावाच आहे.  एका स्वातंत्र्यसैनिकाचे पुत्र असल्यामुळे ध्येयाने व प्रामाणिकपणाने वागणे, आपल्या कार्यावर निष्ठा ठेवून सेवा करणे- हे गुण त्याच्यात उपजतच आले. विलासकाकांनी नव्या पिढीत स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी कायम राहाव्यात व त्यातून देशाची सेवा करण्याची प्रेरणा तरुणांना मिळावी, यासाठी स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन घेण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला. हे फार आवश्यक व योग्य आहे. मी राष्ट्रपती असताना त्यांच्या निमंत्रणावरून अशाच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, याचा मला आनंद आहे. त्यांनी हा उपक्रम चालू ठेवणे आवश्यक आहे आणि ती देशाची गरज आहे असे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विलासराव पाटील उंडाळकरांच्या कार्याविषयी नमूद केले.

संदर्भ - विलासराव काका पाटील यांच्या सुवर्णमहोत्सवी राजकीय कारकीर्द गौरव ग्रंथ. 

खंडोबा देवाची यात्रा रद्द; देवराज पाटलांची मिरवणुकीस परवानगीची मागणी 

आज दुपारी उंडाळे येथे माजी मंत्री उंडाळकर यांच्यावर होणार अंत्यसंस्कार

Edited By : Siddharth Latkar

loading image