

Police officials investigating the crime scene in Chitali village after the brutal murder of a former serviceman.
Sakal
मायणी : चितळी (ता. खटाव) येथील माजी सैनिक रणजित मदन निकम (वय ३८) यांचा गावातीलच पाच जणांनी जुन्या वादातून निर्घृण खून केल्याची घटना काल रात्री घडली. पृथ्वीराज संभाजी पवार, पवन संतोष पवार, संतोष महादेव पवार, भरत शशिकांत पवार, एक अल्पवयीन (सर्व रा. चितळी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबतची फिर्याद मयत रणजितचे बंधू अभिजित मदन निकम (वय ३६, रा. चितळी, ता. खटाव) यांनी पोलिसात दिली आहे.