सातारा : ‘चौरंगीनाथ’जवळ उत्खनन; २१ जून रोजी सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Excavations

सातारा : ‘चौरंगीनाथ’जवळ उत्खनन; २१ जून रोजी सुनावणी

कडेगाव : तालुक्यातील चौरंगीनाथ डोंगराच्या पायथ्याला सातारा जिल्हा हद्दीतून वडगांव हवेली व शेरे स्टेशनच्या दिशेने चालू असलेल्या खाण उत्खननामुळे चौरंगीनाथ देवस्थान व पर्यटन केंद्र परिसराला धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी लोकयुक्त व उपलोकायुक्त यांच्यासमोर २१ जून २०२२ रोजी दुसरी सुनावणी होणार आहे. दरम्यान, पहिल्या सुनावणीला भक्कम पुरावे सादर केल्याने सांगली व सातारा जिल्हाधिकाऱ्यांना या सुनावणीस उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सोनसळ (ता. कडेगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते विश्राम कदम यांनी सातारा जिल्हा हद्दीतून वडगांव हवेली व शेरेस्टेशनच्या दिशेने चालू असलेल्या खाण उत्खननामुळे चौरंगीनाथ देवस्थान व पर्यावरण पर्यटन केंद्र जमीनदोस्त होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असल्याने याबाबत कार्यवाहीसाठी काही दिवसांपूर्वी लोकांयुक्त आणि उपलोकांयुक्त न्यायालय महाराष्ट्र यांचेकडे ७ सप्टेंबर २०२१ रोजा याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर प्रक्रिया करताना लोकांयुक्त आणि उपलोकांयुक्त न्यायालयाकडून गंभीर दखल घेतली आहे. पहिल्या सुनावणीमध्ये भक्कम पुरावे सादर करण्यात आले असून या प्रकरणाची दुसरी सुनावणी २१ जूनला ऑनलाईन सुनावणी आहे.

Web Title: Excavations Near Chowranginath Hearing June 21 Instructions To Attend Sangli Satara District Collector

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..