कोयना धरणातून नदी पात्रात 1050 क्यूसेक विसर्ग

कोयना धरणातून नदी पात्रात 1050 क्यूसेक विसर्ग
Updated on

सातारा : कोयना धरण मंगळवारी (ता. २२) रात्री पूर्णक्षमतेने भरले आहे. धरणातील पाणीसाठा 105.25 टीएमसी झाला आहे. सध्या धरण पायथा विजगृहातून कोयना नदी पात्रात 1050 क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

यापुढे धरणात येणारी आवक पाहून कधीही विसर्ग कमी किंवा जास्त करावा लागणार आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे असा इशारा आज (बुधवार) सकाळी काेयना.धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

सातारा-जावळी असा दुजाभाव मी कधीच केला नाही : शिवेंद्रसिंहराजे

राज्यासाठी वरदायिनी ठरलेले कोयना धरण सलग दहाव्या वर्षी पूर्णक्षमतेने भरले आहे. धरण भरल्याने शेतीसह सिंचन अन्‌ विजेचा प्रश्न निकालात निघाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक तीन हजार 308 क्‍युसेक आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात मागील वर्षापेक्षा यंदा पाऊस कमी झाला आहे. मात्र, तरीही कोयना धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. पाणलोट क्षेत्रात ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने 15 ऑगस्ट रोजी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले होते.

Video : पाच दिवसानंतर संधी मिळताच श्रीनिवास पाटील मराठा आरक्षणावर गरजले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com