esakal | पुण्याप्रमाणे साता-यातील हॉटेल, रेस्टॉरंट मालकांना हवी वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याप्रमाणे साता-यातील हॉटेल, रेस्टॉरंट मालकांना हवी वेळ

रात्रीच्या सुमारास ग्राहकांची संख्या जास्त असल्याने हॉटेल, रेस्टॉरंट वेळेच्या मर्यादेत शिथिलता आणत रात्रीची वेळ वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

पुण्याप्रमाणे साता-यातील हॉटेल, रेस्टॉरंट मालकांना हवी वेळ

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : राज्य सरकारने दोन दिवसांपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरू केली आहेत. यासाठी हॉटेल व्यावसायिकांना वेळेची मर्यादा ठरवून दिलेली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीतील हॉटेल, रेस्टॉरंटची वेळ सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील हॉटेल सकाळी आठ ते रात्री 11 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सातारा जिल्हा हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष राजू भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
 
मागील सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट, फूडकोर्ट, बार बंद असल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याचबरोबर सर्व नियमांचे पालन करत ग्राहकांची काळजी घेण्यात येईल. आता सर्व व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. पुणे महापालिका हद्दीत रात्री दहापर्यंत परवानगी आहे.

जाणून घ्या यंदाच्या नवरात्रातील नऊ दिवसांचे नऊ रंग 

रात्रीच्या सुमारास ग्राहकांची संख्या जास्त असल्याने हॉटेल, रेस्टॉरंट वेळेच्या मर्यादेत शिथिलता आणत रात्रीची वेळ वाढवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी खजिनदार राजन शहा, सचिव राजू घुले, पदाधिकारी, हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी साता-याच्या शिक्षण विभागाची अभिनव कल्पना; फक्त एक फाेन करा 

loading image
go to top