
वडूज: घरकुलाच्या हप्त्याची रक्कम मंजूर करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना खटाव पंचायत समितीमधील विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शरण देवीसिंग पावरा (वय ४३, मूळ रा. अंबापूर, ता. शहादा, जि. नंदूरबार, हल्ली रा. डंगारे पेट्रोल पंपाशेजारी, शिवाजीनगर, दहिवडी, ता. माण) यास ताब्यात घेतले आहे.