esakal | तहसीलदारांचे 'ते' पत्र, फॅब्रिकेटर्संनी घेतला महत्वपूर्ण निर्णय; वाचले अनेकांचे प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen

तहसीलदारांचे 'ते' पत्र, फॅब्रिकेटर्संनी घेतला महत्वपूर्ण निर्णय; वाचले अनेकांचे प्राण

sakal_logo
By
सलीम आत्तार

पुसेगाव (सातारा) : स्वतःचे व्यवसाय बंद ठेऊन येथील नऊ फॅब्रिकेटर्स (Fabricators) व्यावसायिकांनी पुसेगाव कोविड सेंटरला नऊ ऑक्‍सिजन सिलिंडर्सचा (Oxygen Cylinders) पुरवठा करून व्हेंटिलेटरवरील कोविड रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे. तहसीलदार किरण जमदाडे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन तातडीने या कोविड सेंटरला नऊ ऑक्‍सिजन सिलिंडर्सचा पुरवठा या व्यावसायिकांनी केला आहे. (Fabricators Donated Nine Oxygen Cylinders To Pusegaon Covid Center Satara News)

तलाठी गणेश बोबडे व मंडलाधिकारी किसनराव तोडरमल यांनी सर्व ऑक्‍सिजन सिलिंडर जमा करून पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड सेंटरमध्ये उपलब्ध केले आहेत. पुसेगाव कोरोना सेंटरमध्ये (Pusegaon Covid Center) सध्या कोविडचे 88 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या रुग्णांना ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असल्याने व्यवसायासाठी वापरले जाणारे सिलिंडर्स मिळावेत, यासाठी तहसीलदारांनी येथील नऊ फॅब्रिकेटर्सना पत्र देऊन आवाहन केले होते.

Bed, Ventilator अभावी मरताहेत माणसं; प्रशासन आणखी किती जणांचा बळी घेणार?

मानवतेचा विचार करून आपल्या व्यावसायिक फायद्याचा विचार न करता आपण केलेल्या आवाहनास कृष्णा अग्रो इंडस्ट्रीजचे निखिल पोरे, महात्मा फुले वेल्डिंग वर्क्‍सचे चंद्रकांत गोरे, धनवान फेब्रिकेशनचे आप्पाजी आइंगळे, सेवागिरी फॅब्रिकेशनचे प्रवीण नौगण, सद्‌गुरू कृपा मेटल फॅब्रिकेशनचे शिवाजी लोहार, गुरुप्रसाद फॅब्रिकेशनचे केशव सूर्यवंशी, शिवशंभू वेल्डिंग वर्क्‍सचे संजय काटकर, जय हनुमान इंजिनिअरचे गणेश जाधव, येथील सर्व फॅब्रिकेटर्स, धनवान गॅरेजचे संताजी आइंगळे व बबन पोरे या व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन येथील कोविड सेंटरसाठी ऑक्‍सिजन सिलिंडर्सचा पुरवठा करण्याचा मोठा उदात्तपणा दाखवला आहे. पुसेगाव येथील फॅब्रिकेटर्स व्यावसायिकांचा आदर्श घेऊन अन्य व्यावसायिकांनीही ऑक्‍सिजन सिलिंडर्स देऊन रुग्णांना नवसंजीवनी द्यावी, असे आवाहन तहसीलदार जमदाडे यांनी केले आहे.

Fabricators Donated Nine Oxygen Cylinders To Pusegaon Covid Center Satara News