Satara Crime: 'बनावट कृषी औषधे विकणारी टोळी गजाआड'; शाहूपुरी पोलिसांची कारवाई; १२ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त
Counterfeit drugs : बनावट औषधांची खात्री करण्यासाठी टू बडी कन्सल्टिंग प्रा. लि. कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक सतीश पिसाळ यांना सोबत घेऊन करंजे नाका येथे सापळा रचला होता. यामध्ये एका संशयित टेंपोची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये शेतीसाठीची औषधे होती.
Shahupuri Police display seized fake agri-products worth ₹12.59 lakh after busting a counterfeit pesticide racket.sakal
सातारा : शेतीच्या बनावट औषधांची विक्री करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख ५९ हजार ३७० रुपयांची बनावट औषधे व टेंपो जप्त करण्यात आला आहे.