

BJP’s Strategic Move by Atul Bhosale Intensifies Karad South Contest
Sakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कऱ्हाड दक्षिणचे नेते अॅड. आनंदराव उर्फ राजाभाऊ उंडाळकर यांना येळगाव जिल्हा परिषदेचे भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे येळगाव जिल्हा परिषद गटात पुन्हा एकदा अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर विरूध्द अॅड. राजाभाऊ उंडाळकर असा लढा रंगणार आहे. अॅड. राजाभाऊ यांनी दहा वर्षापासून कऱ्हाड दक्षिणेत राष्ट्रवादीचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी मागितली होती. ती न दिल्याने भाजप पुरस्कृत उमेदवारी स्विकारली आहे, असे अॅड. राजाभाऊ यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. अॅड. राजाभाऊ यांच्या भुमिकेने कऱ्हाड तालुक्यातील जिल्हा परिषेदच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.