Satara ST News : एसटी प्रवाशांना भाडेवाढीचा भुर्दंड

कऱ्हाडला उड्डाणपुलाच्‍या कामामुळे बदललेल्या वाहतुकीचा परिणाम : साताऱ्याचा प्रवास महागला
Fare hike for ST passengers changed traffic due to work on Karhad flyover
Fare hike for ST passengers changed traffic due to work on Karhad flyoversakal

सातारा : पुणे- बंगळूर महामार्गावर कऱ्हाडनजीक पाडण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा फटका एसटी प्रवाशांना बसणार आहे. पूल पाडण्यामुळे वळवलेल्या वाहतुकीमुळे एसटी प्रवासाचे टप्पे वाढत असल्याने प्रवाशांना अर्ध्या टप्प्याची भाडेवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्याबाबतच्या भाडे वाढीच्या सूचना एसटी प्रशासनाने राज्यातील सर्वच आगारांना दिल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीसह कऱ्हाडकडून साताऱ्याकडे येणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढ फटका बसणार आहे.

कऱ्हाड शहरालगत राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामांतर्गत सध्याचा उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे. कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर सध्या हे पूल पाडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पोलिसांच्या सूचनेनुसार पुलावरील वाहतूक बंद करून वाहतुकीचा मार्ग बदलला आहे.

पुणे-साताऱ्याहून कऱ्हाड, सांगली कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांना फारसे अंतर वाढत नाही. मात्र, कोल्हापूर, सांगलीमधून कऱ्हाडमार्गे साताऱ्याकडे येणाऱ्या वाहनांना कऱ्हाडमध्ये जाण्यासाठी सुमारे तीन किलोमीटरचे अंतर वाढत आहे.

सांगली, कोल्हापूरकडून कऱ्हाडमध्ये येण्यासाठी मलकापूरला कृष्णा हॉस्पिटलसमोरील उड्डाणपूल संपल्यावर सेवा रस्त्याने वाहने पाटण तिकाटणे वारुंजी फाटा येथे येत आहेत. तेथून उड्डाणपुलाखालून मोठी वाहने पुन्हा पंकज हॉटेलमार्गे कोल्हापूर नाक्यावरून शहरात जात आहेत, तर हलकी व मोटारसायकल जुन्या कोयना पुलावरून शहरात जात आहेत.

दरम्यान, यामध्ये लांब पल्ल्याच्या एसटीची वाहतुकीचा बराच वेळ कऱ्हाडमध्ये जात आहे. दरम्यान, सांगली, कोल्हापूरहून कऱ्हाडमध्ये आलेल्या एसटीला पुन्हा साताऱ्याकडे जाण्यासाठी कोल्हापूर नाक्यावरून सेवा रस्त्याने ढेबेवाडी फाट्यापर्यंत जावे लागत आहे. तेथून सेवा रस्त्याने पुन्हा कृष्‍णा हॉस्पिटलसमोरील उड्डाणपूल संपल्यानंतर येणाऱ्या सेवा रस्त्याने जावे लागत आहे. त्यात सुमारे तीन किलोमीटरचा फेरा वाढत आहे.

या सर्वांचा एसटी प्रशासनाने अभ्यास करून भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढणाऱ्या तीन किलोमीटरने एसटीचा अर्धा टप्पा वाढत आहे. त्यामुळे अर्ध्या टप्प्याची भाडेवाढ केली जात आहे. त्यामुळे सध्या कऱ्हाड ते सातारा ८० रुपयांच्या भाड्यात दहा रुपयांनी वाढ होऊन ती ९० रुपये होत आहे. ही भाडेवाढ कऱ्हाडमधून येणाऱ्या प्रवासासाठी असेल.

मात्र, साताऱ्यातून कऱ्हाडला जाण्यासाठी टप्पा वाढत नसल्याने सातारा ते कऱ्हाडचे तिकीट ८० रुपयेच असेल. उड्डाणपूल पूर्ण होईपर्यंत ही भाडेवाढ राहणार असल्याचे एसटी प्रशासनाने नमूद केले आहे. राज्यातील सर्व आगारांना या वाढीव भाडेवाढीसंदर्भात साताऱ्याचे विभाग नियंत्रकांनी पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. त्यानुसार लवकरच त्याची अंमलबजावणीही सुरू होईल.

कऱ्हाडचा उड्डाणपूल पाडण्यात येत असल्याने वाहतूक मार्ग बदलला आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीकडून येणाऱ्या एसटीचे अंतर व टप्पे वाढत आहेत. त्यासाठी अर्धा टप्पा वाढत असल्याने त्यानुसार आकारणी केली आहे. सर्व आगारांना सूचना केल्या आहेत. मशिनमध्ये मार्ग व टप्पे वाढवण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार वाढीव भाडे आकारणी होईल.

- प्रशांत काळे, सहायक वाहतूक निरीक्षक, सातारा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com