esakal | चल सर्जा, चल राजा.. बिगी-बिगी बिगी जायाचं; शेतकऱ्यांनी शिवारं गजबजली
sakal

बोलून बातमी शोधा

Bulls

तौक्ते चक्रीवादळामुळे यंदा मे अखेरीस जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बळिराजाला दिलासा मिळाला आहे.

चल सर्जा, चल राजा.. बिगी-बिगी बिगी जायाचं; शेतकऱ्यांनी शिवारं गजबजली

sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (सातारा) : तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) यंदा मे अखेरीस जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. त्यामुळे बळिराजाला (Farmers) दिलासा मिळाला आहे. खरीप पेरण्यांना पोषक व आवश्‍यक पाऊस झाल्याने पेरणीपूर्व मशागतींना वेग आला आहे. पुन्हा एकदा सर्जा-राजाच्या ललकारीसह शिवारे गजबजली आहेत. मशागती अंतिम टप्प्यात आल्याने बळिराजा पेरणीत मग्न आहे. (Farm Seeding Started By Bulls In Karad Taluka Satara Agricultural News)

यंदा उन्हाळ्यातील वळिवाने रानातील ढेकळे काही अंशीच फुटली होती. त्यामुळे मशागती खोळंबल्या होत्या. मात्र, तौक्ते चक्रीवादळामुळे पावसाची कसर भरून निघाली. जोरदार पावसाने झोडपल्याने रानात पाणीच पाणी झाले आहे. ढेकळे फुटून माती झाली होती. त्यामुळे बळिराजाने रानात कुळवणी सुरू केली होती. रानातील दगड, कचरा वेचण्यासाठी लगबग सुरू झाली होती.

हेही वाचा: कांद्याचे दर घसरताच शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीकडे कल

शेणखत विस्कटणे आदी कामांची धावपळ सुरू झाली होती. शिवारात खरीपपूर्व मशागतींनी वेग घेतला होता. जूनच्या सुरुवातीपासून पावसाच्या हलक्‍या सरी, तर अधूनमधून विश्रांती घेत पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला. मशागती पूर्णत्वास गेल्या आहेत. काही ठिकाणी पेरण्यांची लगबगही सुरू झाली आहे. विशेषतः डोंगर पठारावर आगाप पेरण्या होत असल्याने तेथे धांदल सुरू आहे. कृषी केंद्रावर बियाणे, खते खरेदीसाठी गर्दी होत आहे.

Farm Seeding Started By Bulls In Karad Taluka Satara Agricultural News

loading image
go to top