Electric Shock: 'विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू'; जांब गावावर शोककळा, वडिलांचाही शिवारातच झाला हाेता मृत्यू
शेतात विहिरीवर जाऊन बघून येतो असे घरी सांगून शेतात गेलेले सोमनाथ आजूबाजूला पडलेले साहित्य गोळा करत होते. यावेळी त्यांचा विजेच्या वायरला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला.
खटाव : जांब (ता. खटाव ) येथील सोमनाथ संभाजी शिंदे (वय ४०) यांचे रविवारी सकाळी (ता.२५ ) शेरी नावाच्या शिवारात त्यांच्या मालकीच्या विहिरीच्या बाजूला काम करत असताना विजेचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.