esakal | ऊसदर प्रश्नी तातडीने बैठक बोलवा; शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Collector Shekhar Singh

शेतकऱ्यांचा ऊस या एकमेव पिकावरच भरोसा आहे. त्याच्या दराचा प्रश्न सोडवण्यासाठी, एकरकमी एफआरपीसंदर्भात योग्य निर्णय होणे गरजेचे आहे.

ऊसदर प्रश्नी तातडीने बैठक बोलवा

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : ऊसदराच्या प्रश्‍नाची (Sugarcane Rate Issue) कोंडी सोडवण्यासाठी शेतकरी संघटना प्रतिनिधी, साखर कारखाना प्रतिनिधी यांची बैठक लावण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या (Farmers Association) वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्याकडे करण्यात आली. शेतकऱ्यांसमोर अनंत अडचणी आहेत. खतांच्या किंमती खूप वाढल्या आहेत. डिझेल दरवाढीमुळे शेती मशागतीचे दर वाढले आहेत. त्यामानाने शेतीमालाला रास्त भाव नाहीत. शेती पिकवताना मेहनत घेऊनही शेतीत घातलेला खर्च निघत नाही. (Farmers Association Demands To Hold A Meeting On Sugarcane Rate Issue bam92)

शेतकऱ्यांचा ऊस या एकमेव पिकावरच भरोसा आहे. त्याच्या दराचा प्रश्न सोडवण्यासाठी, एकरकमी एफआरपीसंदर्भात योग्य निर्णय होणे गरजेचे आहे. एफआरपी बाबतीत शासनाने, कारखानदारांनी योग्य निर्णय घ्यावा. चालू गळीत हंगामात साखर कारखाने किती ऊस दर देणार आहेत, ते प्रत्येक साखर कारखान्याने जाहीर करावे.

हेही वाचा: 'कऱ्हाड-संगमनगर' राज्यमार्ग करा; खासदार पाटलांची राज्‍यमंत्र्यांकडे मागणी

त्यासाठी शेतकरी संघटना प्रतिनिधी, साखर कारखाना प्रतिनिधी यांची बैठक होऊन चर्चा घ्यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष अनिल घराळ, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिंह यांना निवेदनाव्दारे केली. यावेळी जयवंतराव पाटील, सुरेश कदम, हिंदुराव पाटील आदी उपस्थित होते.

Farmers Association Demands To Hold A Meeting On Sugarcane Rate Issue bam92

loading image