Farmers loan Repayment: कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांची परतफेडीकडे पाठ; मुदतीत पैसे न भरल्यास व्याज सवलत योजनेला मुकणार, बँकेकडून तगादा!

Impact of loan waiver rumors on rural banking system: कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांची परतफेड थांबली; व्याज सवलत योजनेचा लाभ गमावण्याची भीती
Farmers at a rural bank branch amid growing concerns over loan repayment deadlines and interest subsidy benefits.

Farmers at a rural bank branch amid growing concerns over loan repayment deadlines and interest subsidy benefits.

Sakal

Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड: लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अगोदरपासून शेतकरी कर्जमाफीची आशा ठेवून बसला आहे. थकीत कर्जामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाही. दुसरीकडे मुदतीत कर्ज परतफेड केल्यानंतर मिळणारा डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या लाभावरही गदा येणार आहे. अडचणी येऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या आशा कायम असून, कर्ज नूतनीकरण करून कर्जाचे पुनर्गठन करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. चालू कर्ज थकीत आल्यानंतर कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची इकडे आड-तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com