जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाई; शेतकऱ्यांसह कर्मचारी आक्रमक

Jarandeshwar Sugar Factory
Jarandeshwar Sugar Factoryesakal

कोरेगाव (सातारा) : जरंडेश्वर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) उसाला एफआरपी (Sugarcane FRP) एवढा किंबहुना त्यापेक्षा जास्त दर देत आहे. अशा परिस्थितीत जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाई (ED Action on Jarandeshwar Factory) झाल्याच्या बातमीमुळे हवालदिल झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये (Farmers in Satara District) भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जरंडेश्वर कारखाना बंद पडू नये, याबाबतचा निर्णय त्वरित घ्यावा. अन्यथा, आम्हाला ऊस उत्पादक (Sugarcane Growers) शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच ‘जरंडेश्वर’चे कर्मचारी व ऊस वाहतूकदारांच्या कुटुंबांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा ऊस उत्पादक शेतकरी, जरंडेश्वर कर्मचारी वर्ग, ऊस वाहतूक कंत्राटदार, ऊसतोडणी मजुरांच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी दिला आहे. (Farmers Demand Withdrawal Of Action Taken By ED On Jarandeshwar Sugar Factory Satara Marathi News)

Summary

जरंडेश्वर कारखाना उसाला एफआरपी एवढा किंबहुना त्यापेक्षा जास्त दर देत आहे. अशा परिस्थितीत जरंडेश्वर कारखान्यावर ईडीची कारवाई झाल्याच्या बातमीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यासंदर्भात सुनील माने, नितीन पाटील, बाळासाहेब सोळसकर, शिवाजीराव महाडिक, राजाभाऊ जगदाळे, मंगेश धुमाळ, तानाजी मदने, प्रताप निकम, श्रीमंत झांजुर्णे, भास्कर कदम, राहुल साबळे, अरुण माने, श्रीमंत झांजुर्णे, राजेंद्र भोसले, शशिकांत पिसाळ, प्रतिभा बर्गे, मनोहर बर्गे, वासुदेव माने, विलासराव बर्गे, रवींद्र भोसले, अॅड. पांडुरंग भोसले, युवराज कदम, विद्याधर बाजारे, ‌विष्णू माने, राजेंद्र जाधव, श्रीरंग शिंदे, अमोल माळी, कल्पेश कदम आदींनी आज तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की जरंडेश्वर कारखान्याची १९८९ मध्ये नोंदणी झाली व तब्बल दहा वर्षांनंतर १९९९ मध्ये पहिला गळीत हंगाम घेण्यात आला; परंतु त्यानंतरच्या काळात चुकीच्या व्यवस्थापनामुळे व निर्णयामुळे कारखाना बंद पडला होता. हा कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून रीतसर कार्यवाही करण्यात आली.

Jarandeshwar Sugar Factory
सेल्फीच्या नादात तरुण 600 फूट दरीत कोसळला
Farmers in Satara District
Farmers in Satara District

पूर्वी अडीच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला हा कारखाना आज दिवसाला ११ हजार मेट्रिक टन गाळप करत आहे, तसेच कारखान्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आमूलाग्र बदल करून सर्व मशिनरी नवीन बसवली असून, कोजनरेशन व डिस्टिलरी प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे कोरेगाव भागातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तुटून उसाला एफआरपीएवढा किंबहुना त्यापेक्षा जास्त दर दिला जात आहे. जरंडेश्वर कारखाना बंद पडू नये, याबाबतचा निर्णय त्वरित घ्यावा. अन्यथा, आम्हाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच ‘जरंडेश्वर’चे कर्मचारी व ऊस वाहतूकदारांच्या कुटुंबांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून जन आंदोलन करावे लागेल, असे निवेदनात नमूद केले आहे.

Jarandeshwar Sugar Factory
पंतप्रधान मोदींच्या विविध निर्णयांमुळे देशाची प्रगती : शेखर चरेगावकर

मोर्चाच्या चर्चेमुळे मोठा बंदोबस्त

‘जरंडेश्वर’वरील इडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज कोरेगावात मोर्चा निघणार, अशी चर्चा सुरू झाल्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना निवेदन दिले.

Farmers Demand Withdrawal Of Action Taken By ED On Jarandeshwar Sugar Factory Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com