esakal | पंतप्रधान मोदींच्या विविध निर्णयांमुळे देशाची प्रगती : शेखर चरेगावकर
sakal

बोलून बातमी शोधा

President Shekhar Charegaonkar

लोकल टू ग्लोबल या कल्पनेसाठी देशातील सहकारी संस्थांचे जाळे हेच प्रभावीपणे कार्य करू शकते. लाखो सहकारी संस्थांच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी जनता ही सहकार चळवळीशी जोडली गेली आहे.

पंतप्रधान मोदींच्या विविध निर्णयांमुळे देशाची प्रगती : शेखर चरेगावकर

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी संमिश्र अर्थव्यवस्था हीच उपयोगी ठरते. केवळ भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे कोणत्याही राष्ट्राची प्रगती झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने (BJP government) केंद्रामध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय (Ministry of Co-operation) निर्मितीचा घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक व स्वागताहार्य आहे, असा विश्वास राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर (President Shekhar Charegaonkar) यांनी व्यक्त केला. (The Formation Of The Ministry Of Co-operation Is Important For The Development Of India Satara Marathi News)

चरेगावकर म्हणाले, लोकल टू ग्लोबल या कल्पनेसाठी देशातील सहकारी संस्थांचे जाळे हेच प्रभावीपणे कार्य करू शकते. लाखो सहकारी संस्थांच्या माध्यमातून देशातील कोट्यवधी जनता ही सहकार चळवळीशी जोडली गेली आहे. या सर्व सभासदांच्या, ठेवीदारांच्या हिताचे रक्षण पंतप्रधान मोदी सरकारच्या या निर्णयामुळे होणार आहे. यातून ग्रामीण भागाचे सक्षमीकरण, महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे मार्केटिंग होवू शकते. बँका, पतसंस्था, दुग्ध, मत्स्य, विणकर, साखर कारखाने अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच बळकटी निर्माण होईल. देशाची सर्वांगीण प्रगतीसाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल.

हेही वाचा: Corona Impact : 'साताऱ्यात कडक लॉकडाउन सुरूच राहणार'

नवीन सहकार मंत्रालयाच्या निर्मितीनंतर सदर विभागासाठी परिपूर्ण वेळ देण्याची व स्वतंत्र बजेटची व्यवस्था होणार आहे. ग्लोबलायझेशसाठी मिळणारा प्लॅटफॉर्म, नॅशनल पेमेंट सिस्टिममध्ये सहकारी संस्थांचा सहभाग या सर्वासाठी हे मंत्रालय निश्चित फायदेशीर ठरणार आहे. या निर्णयामुळे देशातील सहकारी चळवळ सक्षम होण्यास उपयोग होणार आहे. राज्यातील सहकार क्षेत्राला आता केंद्र सरकारच्या धोरणांचे व कायद्यांचे पाठबळ मिळेल. सध्याच्या आव्हानांवर मात करून या क्षेत्रात नवी शिस्त देखील यामुळे निर्माण होईल, असा विश्वास वाटतो.

The Formation Of The Ministry Of Co-operation Is Important For The Development Of India Satara Marathi News

loading image