
-ऋषिकेश पवार
पुसेगाव : रब्बी हंगामातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख असणारा कांदा सध्या उत्तर खटावमधील शेतकऱ्यांना अल्प भावावरून रडवत असल्याचे चित्र आहे. येथील उन्हाळी कांदा बाजारपेठेत आला असताना त्याचे भाव पडले आहेत, तर या भागात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काही शेतकऱ्यांचा कांदा शेतातच खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे येथील कांदा उत्पादकांची स्थिती दरानं मारलं अन् अवकाळीनं झोडपलं, अशी झाली आहे.