
हेमंत पवार
कऱ्हाड : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यासाठी काही दिवस राहिल्याने शेतकरी शेतीची मशागत, बियाणे, खत खरेदीच्या तयारीत आहेत. त्यातच कृषी सहाय्यकांनी ऐन खरिपाच्या मोक्यातच त्यांच्या मागण्यांसाठी कामबंदचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या तोंडावरच शेतीविषयक सल्लाच मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. संपामुळे कृषी सहाय्यकांनी ऑनलाइनच्या कामावरही बहिष्कार टाकल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभाच्या योजनांचाही फटका बसणार आहे.