Father Kills 18-Year-Old Daughter in Satara
esakal
अशपाक पटेल
सातारा ( खंडाळा ) : घरात वारंवार होणाऱ्या किरकोळ त्रासाच्या कारणावरून वडिलांनीच आपल्या १८ वर्षीय मुलीचा चुलत भावाच्या मदतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवण करण्याच्या बहाण्याने मुलीला सोबत घेऊन गेल्यानंतर तिच्या नाकातोंडात चटणीची पुड टाकून तोंड दाबत तिचा जीव घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वडील आणि त्यांच्या चुलत भावाला ताब्यात घेतले आहे.