esakal | वाईत लॉकडाउनविरोधात व्यापारी रस्त्यावर; मानवी साखळी करून शासनाचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

Wai Traders Federation

प्रशासनाला जाग आणण्यासाठी वाई व्यापारी महासंघाने आंदोलन केले. या वेळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाना बाहेर प्रशासनाचा निषेध केला.

वाईत लॉकडाउनविरोधात व्यापारी रस्त्यावर

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (सातारा) : आपल्याला कोरोनाला (Coronavirus) हरवायचे आहे व्यापाऱ्यांना नाही, लॉकडाउन (Lockdown) हटवा व्यापारी जगवा, अशा विविध घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन आणि आपल्या दुकानासमोर रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळी करून वाईतील व्यापाऱ्यांनी आज तीन तास लॉकडाउनच्या विरोधात मूक आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदविला. सकाळी ९ ते ११ या वेळेत संपूर्ण बाजारपेठ (Wai Market) बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर व्यापारी महासंघाच्या (Wai Traders Federation) वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस व पालिका प्रशासनास आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. (Federation Of Traders Agitation Against Lockdown In Wai Satara Marathi News)

आज सकाळी ९ ते २ पर्यंत औषध, किराणा, हार्डवेअर, शालेय साहित्य व कृषिसेवा केंद्रे वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने बंद आहेत. त्याबाबत व्यापारी वर्गात तीव्र नाराजी आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी वाई व्यापारी महासंघाने आंदोलन केले. या वेळी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाच्या बाहेर प्रशासनाचा निषेध म्हणून हातात माझा व्यवसाय माझी जबाबदारी, शासनाच्या नियमांचे पालन करू, व्यापार बंद ठेऊन उपाशी मारू नका, कोरोना पसरायला छोटे व्यापारी जबाबदार कसे, लॉकडाउन हटवा व्यापारी जगवा, आदी फलक घेऊन उभे होते. दुकानातील कामगारही मानवी साखळी करून आंदोलनात सहभागी झाले होते. प्रशासनाचे सर्व नियम म्हणजेच सामाजिक अंतर व मास्कचा वापर करून हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रशासनास निवेदन देण्यात आले.

हेही वाचा: '..तर मराठा समाज सरकारविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही'

व्यापाऱ्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सर्व व्यापाऱ्यांचे यापुढेही सहकार्य राहील. मात्र लॉकडाउनचे निर्बंध असेच सुरू राहिले, तर जगणे कठीण होईल. याचा विचार करून रविवारपासून (ता. ११) सर्व बाजारपेठा उघडण्यास परवानगी द्यावी. अन्यथा सोमवारपासून बाजारपेठ उघडण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे. या वेळी महासंघाचे अध्यक्ष सचिन फरांदे, उपाध्यक्ष उमेश शहा, अजित वनारसे, अशोक लोखंडे, भवरशेठ ओसवाल, हेमंत येवले, किरण खामकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Federation Of Traders Agitation Against Lockdown In Wai Satara Marathi News

loading image