
लोणंद : लोणंद- नीरा रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात विद्यार्थिनी जागीच ठार झाली, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अंकिता अनिल धायगुडे (वय २०, रा. बाळूपाटलाचीवाडी, ता. खंडाळा) असे ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती.