esakal | वाईत वणवा लावल्याप्रकरणी लगडवाडीतील दोघांवर गुन्हा

बोलून बातमी शोधा

Crime
वाईत वणवा लावल्याप्रकरणी लगडवाडीतील दोघांवर गुन्हा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाई (सातारा) : वणवा लावल्याप्रकरणी लगडवाडी (ता. वाई) येथील दोघांवर वाई वनविभागाने गुन्हा दाखल केला. मेहुल तानाजी महानवर व भरत सदाशिव महानवर अशी त्यांची नावे आहेत. लगडवाडी येथील राखीव वनक्षेत्रात मंगळवारी (ता. 20) वणवा लागल्याची माहिती वनविभागाला मिळाली.

त्यावर वणवा विझविण्यासाठी आणि वणवा लागल्याचा कारणांचा शोध घेण्यासाठी अशी दोन पथके तयार करून अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. एकीकडे वणवा विझविण्याचे काम सुरू असतानाच दुसऱ्या पथकाने वणवा कोठून लागला याचा तपास केला. त्या वेळी मेहुल महानवर व भरत महानवर यांनी शेताच्या बांधावरील गवत, पालापाचोळा व काटेकुटे पेटवली असताना वाऱ्यामुळे व उष्णतेच्या तीव्रतेमुळे लगतच्या राखीव वनक्षत्रातील 10 हेक्‍टर क्षेत्र जाळून खाक झाले. त्यामुळे शासनाचे 5 हजार रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान संशयित फरारी झाले होते. त्याचा गावचे सरपंच, पोलिस पाटील व युवक यांच्या मदतीने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आणि त्याच्याविरोधात वन कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार राहील; आमदार शिंदेंचे टीकास्त्र

Edited By : Balkrishna Madhale