esakal | 'रस्‍त्‍यावर पडलेले खड्डे 48 तासांत बुजवा, अन्यथा आंदोलन'
sakal

बोलून बातमी शोधा

satara

'रस्‍त्‍यावर पडलेले खड्डे 48 तासांत बुजवा, अन्यथा आंदोलन'

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : शहरातील (City) प्रभाग क्रमांक एकमधून जाणारा रस्‍ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील असून, या रस्‍त्‍यावर पडलेले खड्डे ४८ तासांच्‍या आत बुजविण्याची मागणी पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी निवेदनाद्वारे बांधकाम विभागाकडे केली. निवेदनानुसार कार्यवाही न झाल्‍यास आंदोलन करण्‍याचा इशाराही हादगे यांनी निवेदनात दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे, शहरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. प्रभाग क्रमांक १ मधील कऱ्हाड- महाबळेश्वर मार्गावर आणि सातारा - कोरेगाव मार्गावर तहसीलदार कार्यालयासमोर सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी सहा ते आठ इंच खड्डे पडले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे लक्षात येत नसल्यामुळे रात्रीच्‍या सुमारास वाहनांचे अपघात होत आहेत.

हेही वाचा: पिंपरी : शहरातील १७२ शाळांची संच मान्यतेची अपूर्ण माहिती

हे अपघात रोखण्‍यासाठी येथील रस्‍त्‍यांची तत्काळ दुरुस्‍ती, डागडुजी करणे आवश्‍‍यक आहे. निवेदनानुसार कार्यवाही न झाल्‍यास तीव्र आंदोलन करत खड्ड्यांमध्‍ये वृक्षारोपण करत शासनाचा निषेध करण्‍याचा इशाराही हादगे यांनी निवेदनात दिला आहे.

loading image
go to top