esakal | राज्यावर कोरोना संकट! महिन्याचे वेतन देऊन 'त्यांनी' जपली सामाजिक बांधिलकी
sakal

बोलून बातमी शोधा

Kisve-Devkate Couple

राज्यावर कोरोना संकट! महिन्याचे वेतन देऊन 'त्यांनी' जपली सामाजिक बांधिलकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना (Corona) संकट हाताळण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. या परिस्थितीत कोरोनाशी धैर्याने लढा देऊन पुन्हा शासकीय सेवेत रुजू झालेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी स्नेहा किसवे-देवकाते व त्यांचे पती पुण्यातील टाटा टेक्‍नॉलॉजीत क्षेत्रीय प्रबंधक असणारे श्रीकांत देवकाते यांनी दायित्वाच्या भावनेतून मुख्यमंत्री साहाय्यता निधीला (CM Assistance Fund) एक महिन्याचे वेतन देऊन हातभार लावला आहे. (Financial Assistance Of Kisve-Devkate Couple To CM Assistance Fund Satara News)

राज्यभरात दुसऱ्या टप्प्यात कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. बाधित नागरिकांची संख्या वाढत असल्याने अनेक नागरिकांना ऑक्‍सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर अपुरे पडत आहेत. त्यामुळे कित्येक बाधित मृत्यूशी झुंज देत आहेत. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत विविध उपाययोजना राबवित आहे. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी आर्थिक मदतीचा आधार देत अनेक दानशूर पुढाकार घेत आहेत.

'वय 70, ऑक्‍सिजन लेव्हल 80 अशा बिकट स्थितीत कोरोनाशी केले दोन हात'

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हापुरवठा अधिकारीपदावर कार्यरत असणाऱ्या स्नेहा किसवे-देवकाते व त्यांचे पती श्रीकांत यांचीही महिन्यापूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. याप्रसंगी दोघेही होम आयसोलेशनमध्ये थांबून कोरोनावर मात करत पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यांनी स्वत: कोरोनाचा अनुभव घेताना आरोग्य विभाग अहोरात्र झटत असल्याचे पाहिले. देवकाते या 2005 रोजी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्या होत्या. त्यांची 2018 मध्ये सातारा जिल्ह्यात बदली झाली आहे.

"मी स्वत: कोरोनाचा अनुभव घेतला असून, आजूबाजूला अनेक जण कोरोनाशी सामना करत आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांच्या लढ्याला हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनीही काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.''

स्नेहा किसवे-देवकाते, जिल्हा पुरवठा अधिकारी

Financial Assistance Of Kisve-Devkate Couple To CM Assistance Fund Satara News

loading image
go to top