
गोंदवले : सातारा- लातूर महामार्गावर गोंदवले बुद्रुकजवळच्या पिंगळी घाटात शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास प्लायवूड वाहतूक करणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. अर्ध्या तासानंतर अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.