Burn Tempo: 'खंबाटकी घाटात टेंपो जळून खाक'; घाटात वाहतूक ठप्प, दोन लाखांच्या साहित्याचेही नुकसान
Fire in Khambatki Ghat: क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. चालक शकील आलम लालबाबू मियॉ (वय २३, आदमपूर, जि. मुतिहारीर, बिहार) याने व साहित्यासोबत रखवालदार म्हणून असणारा अमन कुमार अर्जुन दास (वय २८) याने टेंपोतून बाहेर उडी घेतली. यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
Major Disruption in Khambatki Ghat After Tempo FireSakal
खंडाळा : पुणे- सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या मध्यभागी टेंपोने अचानक पेट घेतला. यामध्ये दोन लाखांच्या साहित्यासह टेंपो जळून खाक झाला. आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.