Sugarcane price : ‘अजिंक्यतारा’चा पहिला हप्ता ३२०० रुपये
Satara News : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगती सुरू असून, कारखान्याने शेतकऱ्यांना जास्तीतजास्त ऊस दर देण्याची परंपरा जोपासली आहे. पारदर्शकपणे कामकाज करून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत.
काशीळ : अजिंक्यतारा कारखान्याच्या २०२४-२५ च्या हंगामामध्ये गळितास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०० रुपयेप्रमाणे पहिला हप्ता देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे यांनी दिली.