सातारा : ‘अजिंक्यतारा’कडून प्रतिटन २६०० रुपये पहिला हप्ता

अजिंक्यतारा कारखान्याचा ३८ वा गळीत हंगाम नियोजनबद्धरितीने सुरू असून, कारखान्याने गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपीनुसार वेळेत बिल अदा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
sugar factories
sugar factoriessakal

काशीळ - अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपी सूत्रानुसार प्रतिटन तीन हजार ६५ रुपये दर दिला असून, एफआरपीपोटी २६०० रुपये प्रतिटन पहिल्या हप्त्याची संपूर्ण रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँकखाती जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

अजिंक्यतारा कारखान्याचा ३८ वा गळीत हंगाम नियोजनबद्धरितीने सुरू असून, कारखान्याने गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपीनुसार वेळेत बिल अदा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाच्या गळीत हंगामात सात लाख ५० हजार मेट्रिक टन एवढ्या विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट असून, हा विक्रम साकारण्यासाठी कारखान्याची संपूर्ण यंत्रणा जोमाने कार्यरत आहे. प्रतिदिन ४३०० मेट्रिक टन क्षमतेने गाळप सुरू असून ११.८३ टक्के साखर उताऱ्याने १,७४,३२० क्विंटल रॉ शुगर उत्पादित करण्यात आली आहे. या गळीत हंगामात २६ ऑक्टोबरपासून ऊस गाळपास सुरुवात झाली असून, २० नोव्हेंबरअखेर एक लाख ११ हजार ३७३ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे.

sugar factories
लग्नानंतर देवदर्शनला न जाता नवदाम्पत्य थेट उदयनराजेंच्या दर्शनाला

या गाळप झालेल्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन २६०० रुपये याप्रमाणे एकूण २८ कोटी ९५ लाख ७१ हजार ३९४ रुपये एवढी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ३० नोव्हेंबर रोजी जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कमही लवकर आणि वेळेत अदा केली जाणार असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले. (कै.) भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्यातील जनतेच्या साक्षीने आणि सहकार्याने लावलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखानारूपी रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. कारखान्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही उच्चतम ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवलेली असून, एफआरपीनुसार शेतकऱ्यांना वेळेत संपूर्ण बिल अदा केले जाईल, असेही आमदार भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com