

Monsoon Uncovers Safety Lapses on Karad Highway; Vehicle Skids Amid Flooded Stretch
sakal
कऱ्हाड: पुणे-बंगळूर महामार्गांतर्गत असलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पहिल्याच पावसात पोलखोल झाली. गटार तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. त्याचबरोबर सुरक्षेच्या उपाययोजना न करण्यात आल्याने एक चारचाकी पाण्यामुळे रस्त्याच्या अंदाज न आल्याने घसरून आडवी झाली. त्याचबरोबर सेवा रस्त्यावरील छाकणे निघाल्याने, काही ठिकाणी तुटल्याने सेवा रस्त्यावरीलही प्रवास धोकादायक बनला आहे.