पाटण आगारातून एसटी सेवा सुरु; पहिली फेरी पोलिस बंदोबस्तात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटण आगारातून धावली पहिली 'लालपरी'; पोलिस बंदोबस्तात पहिली फेरी

पाटण आगारातून एसटी सेवा सुरु; पहिली फेरी पोलिस बंदोबस्तात!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पाटण (सातारा) : पंधरा दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमार्फत आज पाटण कोयनानगर ही एसटीबस पोलिस बंदोबस्तात धावली. त्यामुळे संपात फूट पडल्याचे दिसुन येत असुन प्रवाशांतुन समाधान व्यक्त होत आहे.

एसटी कर्मचाऱ्याना संप सुरु केला. त्यामुळे प्रवाशांचे मोठा हाल झाला. दरम्यान कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्यामुळे या संपात फुट पडल्याचे बोलले जात आहे. काही एसटीचे कर्मचारी पाटण आगार हजर झाले. त्यामुळे त्यांच्यामार्फत पाटण कोयनानगर ही एसटीबस पोलिस बंदोबस्तात सुरु करण्यात आली. त्यामुळे एसटीच्या संपात फुट पडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या पहिल्या एसटी फेरीची पाहणी पाटणचे आगार प्रमुख निलेश उथळे यांनी केली. दरम्यान श्री. उथळे म्हणाले, पाटण ते कोयना या मार्गावर लालपरी पंधरा दिवसांनी सुरू केली आहे.

हेही वाचा: Vidhan Parishad Election : 415 मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द

एसटीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांचे तिकीट बुकिंग पाटण आगारात केले जाते. मगच वाहतूक रवाना केली आहे. आज एक कर्मचारी कामावर हजर झाला असून वाहतूक चालु झाल्यामुळे हळूहळू इतर कर्मचारी सुध्दा कामावर हजर होतील. पाटण-कोयनानगर एसटी सुरु झाल्यामुळे कोणताही अनुचीत प्रकार होवू नये यासाठी यावेळी कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकात माळी यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

loading image
go to top