Don't Worry! साताऱ्यात उभारणार 'Oxygen Cylinder'चे पाच प्लॅंट; Covid रुग्णांना दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Cylinder

Don't Worry! साताऱ्यात उभारणार 'Oxygen Cylinder'चे पाच प्लॅंट; Covid रुग्णांना दिलासा

सातारा : जिल्ह्यात ऑक्‍सिजनची कमतरता जाणवत असली, तरी तातडीने उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पाच ठिकाणी लिक्विड ऑक्‍सिजनचे 125 जंबो सिलिंडर भरण्याचे प्लॅण्ट बसविले जाणार आहेत. त्यामुळे ऑक्‍सिजनची कमतरता भरून निघणार आहे. यासोबतच पाच हॉस्पिटलमध्येही अशा प्रकारची यंत्रणा बसवून जंबो ऑक्‍सिजन सिलिंडर भरण्याची यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनची कमतरता असली, तरी तातडीची उपाययोजना करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग उच्च पातळीवर पोचला आहे. दररोज दिड हजारावर बाधित सापडत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून व्हेंटीलेटर, ऑक्‍सिजन बेड मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. शासकीय, खासगी रुग्णालयांतही बेड उपलब्ध नाहीत. रेडमिसिव्हर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत आहे. या स्थितीत बाधितांसह त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यातच लिक्विड ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, ऑक्‍सिजन सिलिंडर भरण्यासाठी टॅंकरची वाट पाहावी लागत आहे, असे टॅंकर ट्रॅक करून तो सातारा जिल्ह्यात आणून आपली गरज भगविण्यावर सध्या जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्‍सिजनचा तुटवडा कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यभरच ऑक्‍सिजनच्या वाटपाचे नियोजन विस्कळित झालेले असले, तरी सातारा जिल्हा प्रशासनाने मात्र, तातडीने ऑक्‍सिजन उपलब्ध करण्यावर भर दिला आहे.

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

ऑक्‍सिजनची भविष्यात टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने लिक्विड मेडिकल ऑक्‍सिजनचा प्लॅंट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कऱ्हाड, फलटण, काशीळ अणि कोरेगाव येथे प्रतिदिन 125 जंबो सिलिंडर भरण्यात येतील. यामध्ये हवेतील ऑक्‍सिजन घेऊन त्यावर प्रक्रिया करून तो लिक्विड ऑक्‍सिजन जंबो सिलिंडरमध्ये भरला जाणार आहे. यासोबतच इतर पाच हॉस्पिटलमध्येही असाच प्लॅंट बसविण्याचे नियोजन आहे. सोमवारपासून (ता. 2) लिक्विड मेडिकल ऑक्‍सिजन मिळण्यातील अडचणी दूर होतील, तसेच आवश्‍यक तेवढे सिलिंडर उपलब्ध होऊ शकणार आहेत. ऑक्‍सिजनच्या उपलब्धतेसाठी लोकप्रतिनिधींसह अधिकारीही प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्‍सिजन कमी पडणार नाही. मात्र, ऑक्‍सिजन वापरताना होणारी हेळसांड, गरजेनुसारच ऑक्‍सिजन देण्याची व्यवस्था, तसेच लहान लिकेज यातून ऑक्‍सिजन वाया जाणार नाही, याची काळजी रुग्णालयांनी घेणे गरजेचे आहे. गरज असेल, तरच हाय फ्लो नेसल ऑक्‍सिजनचा वापरला पाहिजे. काही पेशंटला ऑक्‍सिजनची गरज नसतानाही त्याला दोन ते तीन लिटर ऑक्‍सिजन दिला जातो. या प्रकाराला आळा घालणे गरजेचे आहे.

लोणंदची 'सोना' देणार महाराष्ट्राला 'संजीवनी'; अलॉयजमध्ये 15 टन ‘ऑक्सिजन’ची निर्मिती

जिल्ह्यात ऑक्‍सिजनचे जंबो सिलिंडर मिळण्यात अडचणी येत आहेत; पण ऑक्‍सिजनचा तुटवडा नाही. जिल्हा प्रशासन लिक्विड ऑक्‍सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यावर प्रयत्न करत आहे. लवकरच पाच ठिकाणी लिक्विड ऑक्‍सिजन भरण्याचा प्लॅंट बसविला जाणार आहे. त्यातून प्रतिदिन 125 जंबो सिलिंडर भरले जातील. त्यामुळे भविष्यात ऑक्‍सिजनची कमरता जिल्ह्यात भासणार नाही.

-शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

Edited By : Balkrishna Madhale

Web Title: Five Oxygen Cylinder Plants To Be Set Up At

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top