साताऱ्यातील 5 कारखाने Black list यादीत; शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी

Jarandeshwar Sugar Factory
Jarandeshwar Sugar Factoryesakal
Updated on
Summary

साखर आयुक्तांनी जाहीर केलेल्या ब्लॅक लिस्ट (Black list) यादीत सातारा जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश आहे.

कऱ्हाड (सातारा) : साखर आयुक्तांनी जाहीर केलेल्या ब्लॅक लिस्ट (Black list) यादीत सातारा जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश आहे. त्या कारखान्यांना (Sugar Factory) ऊस गाळपास देताना शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे (Baliraja Shetkari Sanghatana) जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला (Sajid Mulla) यांनी शेतकऱ्यांना केलेय.

मुल्ला पुढे म्हणाले, 2020-21 च्या गाळप हंगाममध्ये ज्या कारखान्यांनी एफआरपी दिला नाही अथवा एफआरपी देण्यास विलंब केला, अशा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची यादी प्रसिद्ध केलीय. त्याबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही आभार मानतो. महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांनी सुरुवातीला गाळप झालेल्या उसाचा ज्यादा दर दिला. परंतु, नंतर गाळप झालेल्या उसाची बिले वेळेत दिली नाहीत. काही कारखान्यांनी उसाची बिले बुडविली आहेत. त्यात दुर्देवाने काही खासदार, आमदारांच्या कारखान्यांचा समावेश आहे.

Jarandeshwar Sugar Factory
एफआरपीच्या तुकड्याला शेतकरी संघटनांचा विरोध

सातारा जिल्ह्यातील किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, खंडाळा तालुका साखर कारखाना म्हावशी, गुरु कमोडिटी सर्व्हिसेस लिमिटेड चिमणगाव चालवणारे जरंडेश्वर शुगर, स्वराज इंडिया अग्रो लिमिटेड उपळवे, ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड गोपूज या पाच कारखान्यांचा समावेश आहे. त्या पाच साखर कारखान्यांचा साखर आयुक्तांनी ब्लॅक लिस्टमध्ये समावेश केलाय. शेतकऱ्यांनी या कारखान्यांना आपला ऊस गाळपास देताना सावधानता बाळगावी, असे आवाहनही मुल्लांनी केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crores Lost as Heavy Winds Rip Off Shed Sheets, Sugar Stock Damaged by Rain
Karad Nandalapur flyover completion update
Dreams Cut Short: 16-Year-Old Student Dies in Head-On Crash Near Banpuri
Mahayuti Stands Together, Says Desai; Voting Decision Left to Eknath Shinde
Marathi News Esakal
www.esakal.com